स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यासाठी विभागवार वेळापत्रक
स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यासाठी विभागवार वेळापत्रक.
विद्यार्थ्याचे आधार अपडेट करत असताना स्टुडन्ट वरील माहिती मिस मॅच होते त्याचबरोबर आधार अपडेशन मध्ये त्रुटी दिसतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे मुख्य माहितीचा स्त्रोत असणाऱ्या सरल पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांची माहिती बिनचूकपणे अपडेट करण्यासाठी शिक्षण विभागाने विभागवार वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार संबंधित विभागातील शाळांनी आपल्या शाळांची स्टुडन्ट पोर्टल मधील दुरुस्ती असल्यास ती करून घ्यावी. विभागवार वेळापत्रक दिल्याने पोर्टलवर एकदमच वाढणारा ताण कमी होऊन केलेल्या दुरुस्त्या लवकर होतील. एकाच वेळी अनेक शाळा पोर्टल ॲक्सेस करतात त्यामुळे माहिती सेव न होणे, पोर्टल बंद पडणे व इतर समस्या उद्भवतात. आधार जोडणी असणाऱ्या विद्यार्थ्यानुसार शाळांची संच मान्यता होणार असल्याने माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या विद्यार्थ्यांची सरल पोर्टल मधील दुरुस्ती असल्यास करून घ्यावी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई.
Comments
Post a Comment