महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 64 वे वार्षिक अधिवेशन ऐतिहासिक कराड नगरीत 25 व 26 ओक्टोंबर रोजी संपन्न होणार
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 64 वे वार्षिक अधिवेशन ऐतिहासिक कराड नगरीत 25 व 26 ओक्टोंबर रोजी संपन्न होणार
दिनांक 09 ओक्टोंबर 2015
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 64 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन कराड येथे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांचे 64 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर, कराड, जिल्हा सातारा येथे पार पडणार आहे.सदर अधिवेशनात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष श्री. तानाजीराव माने (सोलापूर) व सचिव श्री. नंदकुमार सागर (पुणे) यांनी केले आहे.
या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. मुकेश पाटील भूषवणार आहेत. राज्यातील शिक्षणमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी या अधिवेशनास उपस्थित राहणार असून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर उपाययोजना होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर दोन शोधनिबंध सादर केले जातील. तसेच शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट सेवा व नवोपक्रम करणाऱ्या मुख्याध्यापकांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. खुले अधिवेशन, परिसंवाद, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती आणि संघटनात्मक विषयांवरील चर्चा असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकांचे स्टॉल देखील उपलब्ध असतील.
अधिवेशनाचे संयोजन सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आले असून उपस्थित मुख्याध्यापकांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे. महिला मुख्याध्यापक भगिनींसाठी स्वतंत्र वस्तीगृहात व्यवस्था करण्यात येणार आहे.
सदर अधिवेशनासाठी राज्यातील सर्व मुख्याध्यापक बंधू-भगिनींना नियोजन करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्धी विभाग महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई
Comments
Post a Comment