मुख्याध्यापकांच्या विक्रमी उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आश्वासक वातावरणात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे वार्षिक अधिवेशन संपन्न
मुख्याध्यापकांच्या विक्रमी उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आश्वासक वातावरणात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे वार्षिक अधिवेशन संपन्न. महामंडळ वार्ता- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबईचे 63 व्या वार्षिक अधिवेशन दापोली जिल्हा रत्नागिरी येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहामध्ये दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांच्या विक्रमी प्रतिसादा बरोबरच शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांच्या विचार मंथनासोबत शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या बदलांवर चर्चा त्याचबरोबर शासन स्तरावरील मंत्री महोदयांच्या उपस्थितीने व त्यांनी दिलेल्या ग्वाहीने शिक्षण क्षेत्रातील प्रश्न बाबत आश्वासक वातावरणामध्ये पार पडले. दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे पार पडले. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील मुख्याध्यापक बांधवांनी विक्रमी उपस्थिती लावली. त्या अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रातील सध्या भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची चर्चा व उहापोह करण्यात आला. त्यामध्ये जुनी पेन्शन...
Comments
Post a Comment