महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्यस्तरीय कृतीसत्र संपन्न
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय, शैक्षणिक कृतीसत्र २६ व २७ मे २०२२ रोजी भारतीय जैन संघटना, वाघोली, ता.हवेली, जि.पुणे येथे संपन्न झाले मा. शिक्षण संचालक महेश पालकर साहेब यांच्या शुभहस्ते कृतीसत्रा चा शुभारंभ करण्यात आला यावेळी महामंडळाचे अध्यक्ष सर्वश्री जे के पाटील, विद्या समिती अध्यक्ष आर डी निकम, मा. शिक्षणाधिकारी सुनील कुह्रडे , मा.उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी, मा.अध्यक्ष अरुण थोरात, सचिव शांताराम पोखरकर, जैन शैक्षणिक संकुलाचे प्रकल्प अधिकारी साळुंखे साहेब, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मात्रे,सहसचिव सुनिल पंडित,विद्यासमिती सचिव संजयकुमार झांबरे,सहसचिव बी एस माळी,संपादक भरत मोझर, ऑडिटर संदेश राऊत,मा.सचिव आदिनाथ थोरात,मा.अधिवेशन अध्यक्ष शिवाजीराव किलकिले, प्रवक्ते महेंद्र गणपुले, पदाधिकारी रामचंद्र धावरे, अरुण भोईर, जयसिंग कदम, हरिश्चंद्र गायकवाड, अमृत पांढरे, बी बी पाटील, विजय पाटील, सुरेश सपकाळ, संजय पाटील, माणिक दुतोंडे, संजय कांबळे इ. महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य,विविध जिल्ह्यातून आलेले कौन्सिल सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
द्वितीय सत्रामध्ये जी आर संकलन समितीच्या सात गटाच्या प्रमुखाचे मार्गदर्शन व गटचर्चा घेण्यात आल्या यामध्ये विविध विषयानुसार सात गट तयार करण्यात आले होते. यामध्ये सर्व सदस्यांनी विविध शासन आदेशावर विचारविनिमय करून, चर्चा करून, टिप्स काढून आराखडा तयार केला. या कार्याचे नियोजन श्री संदेश राऊत यांनी केले.
दि.२७ मे २०२२ रोजी मा. शिक्षणाधिकारी प्रकाश परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गट प्रमुख यांनी आपल्या विषयाचे सादरीकरण केले यावेळी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर डॉ.नेहा बेलसरे मॅडम, सहसंचालिका, एस सी ई आर टी, पुणे यांनी मार्गदर्शन केले. महामंडळाच्या सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांचा संयोजक पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने यथोचित सत्कार / सन्मान करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हे कृतीसत्र यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड व सर्व कार्यकारणी सदस्य आणि भारतीय जैन शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य संतोष भंडारी व त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment