महाराष्ट्रा राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ६३ वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे १२ व १३ एप्रिलला संपन्न होणार - तानाजीराव माने

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ६३ वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे १२ व १३ एप्रिल रोजी संपन्न होणार - तानाजीराव माने 

(महामंडळ वार्ता ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६३ वे वार्षिक  अधिवेशन दापोली जिल्हा रत्नागिरी येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर् विश्वेश्वरय्या सभागृहात दिनांक १२ व १३ एप्रिल रोजी  संपन्न होत असून महाराष्ट्रातील तमाम मुख्याध्यापक बंधू- भगिनींनी या अधिवेनास उपस्थित राहावे असे अवाहन  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे  अध्यक्ष तानाजीराव माने व सचिव नंदकुमार सागर यांनी केले आहे.  

         रत्नागिरी  जिल्हा माध्यमिक व उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या  सायोजानाखाली सदर अधिवेशन पार पडत असून सादर आधीवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नावर तसेच महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणावर चिंतन होणार आहे. सादर अधिवेशनास महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळातील मंत्री  तसेच विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य तसेच शिक्षण क्षेत्रातील राज्य पातळीवरील प्रशासकीय अधिकारी उस्थित राहाणार आहेत.या बरोबरच या अधिवेशानामध्ये दोन शोध निबंध सादर करण्यात येणार आहेत.तसेच  शिक्षण क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनपार व्याख्यानांचे अआयोजन करण्यात आलेले आहे,

       याबरोबरच  महामंडळाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याध्यापकांना महामंडळाच्य वतीने राज्यस्तरीय  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी महाराष्ट्रातील मुख्याध्यापक बंधू-भगिनींनी  सदर अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन  महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्याध्यापकांच्या विक्रमी उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आश्वासक वातावरणात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे वार्षिक अधिवेशन संपन्न

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ 63 वे अधिवेशन - यायला लागतय

मुख्याध्यापक महामंडळ 63 वे अधिवेशन संबंधी डिजीटल साहित्य डाऊनलोड करणे साठी लिक