Posts

Showing posts from April, 2025

मुख्याध्यापक महामंडळ 63 वे अधिवेशन संबंधी डिजीटल साहित्य डाऊनलोड करणे साठी लिक

मुख्याध्यापक महामंडळ 63  वे अधिवेशना संबंधी डिजीटल साहित्य डाऊनलोड करणे साठी लिक  महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ 63 वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे 12 व 13 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांच्या विक्रमी उपस्थितीत संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये अध्यक्ष भाषण, शोधनिबंध, महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल, प्रकाशित स्मरणिका हे सर्व साहित्य आपल्याला डिजिटल रूपाने उपलब्ध करून देण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या ब्लॉग वरती जाऊन आपण हे डाऊनलोड करून घेऊ शकता. सदर ब्लॉगवर मुख्याध्यापकांच्या उपयोगासाठी बरेच साहित्य डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. ब्लॉग ची लिंक खालील प्रमाणे  https://maharashtrahm.blogspot.com/ या ब्लॉग वरती मागील अधिवेशने व मागील चार वर्षातील महाराष्ट्र एज्युकेशनल जनरल चे अंक, अध्यक्ष भाषणे शोधनिबंध, कृती सत्रातील शोधनिबंध आपल्याला पाहता येतील.  63 व्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषण पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://drive.google.com/file/d/1jZApxGuf4ANOXP2NhKThfKjT...

मुख्याध्यापकांच्या विक्रमी उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आश्वासक वातावरणात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे वार्षिक अधिवेशन संपन्न

Image
मुख्याध्यापकांच्या विक्रमी उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आश्वासक वातावरणात महाराष्ट्र राज्य  मुख्याध्यापक महामंडळाचे  63 वे वार्षिक अधिवेशन संपन्न. महामंडळ वार्ता- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबईचे 63 व्या वार्षिक अधिवेशन दापोली जिल्हा रत्नागिरी येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहामध्ये दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांच्या विक्रमी प्रतिसादा बरोबरच शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांच्या विचार मंथनासोबत शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या बदलांवर चर्चा त्याचबरोबर शासन स्तरावरील मंत्री महोदयांच्या उपस्थितीने व त्यांनी दिलेल्या ग्वाहीने शिक्षण क्षेत्रातील प्रश्न बाबत आश्वासक वातावरणामध्ये पार पडले. दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे  पार पडले. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील मुख्याध्यापक बांधवांनी विक्रमी उपस्थिती लावली. त्या अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रातील सध्या भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची चर्चा व उहापोह करण्यात आला. त्यामध्ये जुनी पेन्शन...

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ 63 वे अधिवेशन - यायला लागतय

  ✨ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई ✨ 🎉 ६३ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन 🎉 📅 दिनांक: १२ व १३ एप्रिल २०२५ 📍 स्थळ: सर् विश्वेश्वेरय्या सभागृह, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी 📌 अधिवेशनाचे मुख्य आकर्षण: ✅ शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा ✅ शिक्षणमंत्री व अन्य मंत्रीमंडळातील सदस्यांची उपस्थिती ✅ राज्य विधिमंडळातील सदस्यांचा सहभाग ✅ शोध निबंध सादरीकरण व शिक्षणातील नव्या संकल्पनांवर चर्चा ✅ शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने ✅ उत्कृष्ट मुख्याध्यापकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान ✅ शैक्षणिक साहित्य व उपयुक्त पुस्तके यांचे स्टॉल ✅ कोकण कृषी विद्यापीठाच्या आवारात उत्तम निवास व भोजन व्यवस्था ✅ महिला मुख्याध्यापकांसाठी विशेष निवास सुविधा ✅ कोकणातील सुंदर पर्यटन स्थळे पाहण्याची संधी 📞 संपर्कासाठी: ▶ तानाजी माने (अध्यक्ष) - 8275202906 ▶ नंदकुमार सागर (सचिव) - 9850501019 ▶ संदेश राऊत (कोषाध्यक्ष) - 9422433188 ▶ रमेश तरवडेकर (सहसंपादक) - 7507070551 ▶ आयुब मुल्ला (अध्यक्ष, रत्नागिरी मुख्याध्यापक संघ) -...

महाराष्ट्रा राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ६३ वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे १२ व १३ एप्रिलला संपन्न होणार - तानाजीराव माने

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ६३ वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे १२ व १३ एप्रिल रोजी संपन्न होणार - तानाजीराव माने  (महामंडळ वार्ता )  :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६३ वे वार्षिक  अधिवेशन दापोली जिल्हा रत्नागिरी येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर् विश्वेश्वरय्या सभागृहात दिनांक १२ व १३ एप्रिल रोजी  संपन्न होत असून महाराष्ट्रातील तमाम मुख्याध्यापक बंधू- भगिनींनी या अधिवेनास उपस्थित राहावे असे अवाहन  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे  अध्यक्ष तानाजीराव माने व सचिव नंदकुमार सागर यांनी केले आहे.              रत्नागिरी  जिल्हा माध्यमिक व उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या  सायोजानाखाली सदर अधिवेशन पार पडत असून सादर आधीवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नावर तसेच महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणावर चिंतन होणार आहे. सादर अधिवेशनास महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळातील मंत्री  तसेच विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य तसेच शिक्षण क्षेत्राती...